Disha Shakti

राजकीय

केंद्रीय राज्य मंत्री खा.रामदास आठवले यांचे नरसीत जंगी स्वागत

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलिंद बच्छाव : केंद्रीय राज्यमंत्री तथा खा.रामदास आठवले हे नियोजित मुखेडच्या मेळावा संपल्यानंतर नरसी मार्गाने हैद्राबाद जात असताना नरसी चौकात माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे यांनी फटाक्याची अतिश बाजी करत त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.रामदास आठवले हे दि.१६ रोजी नांदेड दौ-यावर आले होते .मुखेड येथील कार्यक्रम आटोपून हैदराबाद येथे जात असताना त्यांचे सायकांळी पाच वाजता नरसी चौकात आगमन झाले .त्यांचा सत्कार करण्यासाठी धम्मदीप भद्रे कांडाळकर यांनी शेकडो कार्यकर्ते घेऊन थांबले होते .खा.आठवले यांचे आगमन होताच फटाक्याची अतीश बाजी करून पुष्पहार घालून खा.आठवले यांचे जंगी स्वागत करण्यात आले .त्यानंतर खा.रामदास आठवले यांनी जमलेल्या कार्यकर्त्यां सोबत खुली चर्चा केले. विशेष म्हणजे धम्मदीप कांडाळकर हे गेल्या दोन वर्षांपासून खा.आठवले यांच्या संपर्कात असुन खा.आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रे यांनी नरसी चौकात खिचडी वाटप व फळे वाटप केले होते.

याप्रसंगी नरसीचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे,व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर, पत्रकार जाफर भाई, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष पेरकेवार, डॉ संतोष उच्चेकर, अजीम शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोंधळे, किरण वाघमारे , विशभंर काबंळे, हानमंतराव भेदे ,अमोल भद्रे गोदमगांवकर , नितीन गायकवाड, साहेबराव चट्टे ,हाणमंत चंदनकर ,नरसी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!