अहमदनगर प्रतिनिधी / युनूस शेख : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी धनश्री नंदकुमार सोनकांबळे वय २९, रा. यशवंतनगर, डेअरी फार्म, चर्च जवळ, केकती, ता. नगर या नगर पाथर्डी रोडने भूईकोट किल्ल्या समोरुन जाताना कोणीतरी अनोळखी इसमाने फिर्यादीचे गळ्यातील ४०,०००/- रुपये किंमतीचे १७ ग्रॅम वजनाचे मिनीगंठण ओढून तोडून बळजबरीने चोरुन नेले बाबत भिंगार कॅम्प पो.स्टे.गु.र.नं. ५१/२०२४ भादविक ३९२ प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधा करीता पथक नेमुण जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक ०२/०२/२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, अंमलदार रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष लोढे, संदीप दरंदले, फुरकान शेख, ऋपोहेको/ अरुण मोरे व अर्जुन बडे अशांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथक अहमदनगर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा आरोपी नामे सलीम शेख रा. संभाजी नगर याने केला असुन तो चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी बु-हानगर ते अहमदगर रोडने पायी चालत येत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने लागलीच बेल्हेश्वर चोक, बु-हानगर रोड येथे जावुन, सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम पायी चालत येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख वय ५४, रा. सांजा रोड, जाळी कारखान्या समोर, धाराशिव मुळ रा. कासीम ब-ही दर्गा, पढेगांव, जिल्हा संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात सोन्याचे दागिने मिळुन आले. नमुद दागिन्याबाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने भूईकोट किल्ल्या समोर चेन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने विक्री करीता घेवुन जात असल्याची माहिती दिल्याने आरोपीस ९८,६००/- रुपये किंमतीचे १७ ग्रॅम सोन्याचे मिनीगंठण सह ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेव, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. हरीष खेडकर साहेब, पोलीस उपअधीक्षक (गृह), अतिरिक्त प्रभार, उपविभगीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
भूईकोट किल्ला भिंगार येथून चैन स्नॅचिंग करणारा आरोपी सोन्याचे दागिन्यासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

0Share
Leave a reply