Disha Shakti

क्राईमसामाजिक

जिल्हा परिषद शाळा शेरी येथे हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न

Spread the love

प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी येथे हळदी कुंकू वाचा कार्यक्रम हा मुख्यध्यापिका आडसूळ मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. इ. स.च्या तिसऱ्या व चौथ्या शतकापासून वाडमयात कुंकूवाचे उल्लेख आढळतात. पूजा, विधी, आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्य द्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्रिया आपल्या पतीच्या कुंकाला फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्याचे लेने असते. कुंकू हे सुवसिनीला सुवसिनीनेच लावायचे असते.

समाजातील सर्व थरांच्या स्रियांत विशेष प्रसंगी स्रियासाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरु आहे, हळदी समारंभ म्हणजे गृहिणी पूजन, आदर सत्कार व स्नेह मिलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे. . यावेळी उपस्थित मुख्यध्यापिका सौ.आडसूळ मॅडम, अंगणवाडी सेविका सौ.मंगल काकडे, मदतनीस सौ.बिस्मिल्ला शेख,काकडे मॅडम,दुधावडे मॅडम,इंदुबाई काकडे, सुलोचना काकडे, आदी महिला भगिनी उपस्थित राहून हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली.महिलांना भोजन देऊन हळदी कुंकू वाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!