संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच संस्कार मूल्य जपणारा मातृ-पितृ पूजन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे योग वेदांत सेवा समिती संगमनेर येथील साधक व सध्या दाढ बुद्रुक येथे कार्यरत असलेले प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आनंद कोल्हे व शिवप्रसाद वर्पे कनोलीकर हे लाभले होते यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना अनमोल मार्गदर्शन केले. आपल्याकडे भारतीय संस्कृती रूढ असल्यामुळे कार्यक्रमांद्वारे विविध दिनाचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजू करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना याची माहिती प्राप्त होते मातृ-पितृ दिनाचे महत्त्व या कार्यक्रमाद्वारे त्यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थी व पालकांना पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने महिला पालक वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. व तसेच या कार्यक्रमानिमित्त महिला पालकांनीही आपापले मनोगते व्यक्त करून शाळेमध्ये झालेले बदल, सुधारणा याबाबत समाधान व्यक्त करून असेच अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करावे व त्यासाठी आमचे कायमस्वरूपी योगदान देऊ असे आश्वासन पालक वर्गाने दिले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल पिंपरी लौकी अजमपुर येथील केंद्रप्रमुख श्री. इंद्रभान पावसे यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व विद्यार्थी व त्यांचे आई-वडील यांना खूप खूप धन्यवाद देऊन यांचेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व पालकांनी कौतुक केले.
कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पलता सुलाखे, शिक्षक श्री.राजेंद्र जोशी यांनी केले. व तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
चणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मातृ-पितृ पूजन दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

0Share
Leave a reply