संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या साकुर गावाला खाजगी सावकारांनी विळखा घातला आहे. साकुर गावातील एका पीडित कुटुंबाने दोन कुप्रसिध्द खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून व त्यांचेकडून समाजात होणारी बदनामी, वारंवार गुंड प्रवृत्तीचे लोक घरी पाठवून दमबाजी तर पैशाच्या जोरावर पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची व कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकीतून,पैशासाठी वारंवार लावलेल्या तगाद्याने त्रस्त झालेल्या कुटुंबानं जीवनातून मुक्त होण्यासाठी कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगीची मागणी बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे केली आहे.या निवेदनात त्यांनी घारगाव पोलिस स्टेशनचे एका पोलिस आधिकारी यांनी धमकी दिल्याचा देखील आरोप केला आहे.
तालुक्याच्या पठार भागातील संगीता वाकचौरे व पती विलास वाकचौरे तर त्यांचे कुटुंब साकुर गावातील रहिवासी आहे.या कुटुंबाने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की गावातील कुप्रसिद्ध सावकार राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे यांचेकडून काही आर्थिक ओढाताण व अडचणीमुळे काही रक्कम व्याजाने घेतलीं होती.वाकचौरे कुटुंबानं ठरलेल्या रक्कमेच्या व्याजापेक्षा चार पट पैसे ज्यादा दिलेत. यादरम्यान सचिन डोंगरे व राहुल डोंगरे या सावकारांनी पिडीत वाकचौरे यांची पिळवणूक करत कुटुंबाला राहते घर खाली करण्यासाठी वेठीस धरले. पिडीत दाम्पत्याला व त्यांचें मुलांना जिवे मारण्याची धमकी दिलीय.तर गावात व नातेवाईकांत पिडीत महिलेची बदनामी करत फिरत आहे.गुंड प्रवृत्तीचे लोक वारंवार घरी येऊन पीडित कुटुंबाला दमबाजी करत आहे. विशेष म्हणजे पोलिसांची धमकी देऊन आमचा मोठा वशिला आहे.आम्ही तुला व तुमच्या मुलांना जिवे मारून टाकू शकतो.अशी धमकी पिडीत महिलेस दिली गेलीय, घारगाव पोलिसांत आमची खूप चलती आहे.पाच-दहा लाख आम्ही त्यांना देऊ शकतो. तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतो. अशी धमकी सावकारांनी पिडीत कुंटुंबातील महिलेला दिली आहे.
घारगाव पोलिस स्टेशनचे एका आधिकाऱ्याने पिडीत कुटुंबाला पोलिस स्टेशनला बोलावून घेतले. तेथे पोलिस आधिकारी व सावकार सचिन बन्सी डोंगरे तर किसन डोंगरे यांनी धमकी दिली. घारगाव पोलिस ठाणे या सावकारांना मदत करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.पिडीत वाकचौरे कुटुंबातील महिलेने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी यांना म्हटले आहे.की साहेब मी सर्व पुरावे अर्जासोबत आपणास जोडून देत आहे.असो तरीही मला असे वाटते की मला कधीही न्याय मिळणार नाही.म्हणून मी आणि माझे कुटुंबीयांनी जिवन त्याग करण्याचा विचार केला असून सर्वजण फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने आमच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे. त्यांची नावे सांगून जीव देऊन टाकू. त्यासाठी आपण आम्हास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
यादरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता साकुर गावात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचे मार्गदर्शन नुसार एक पथक, संगमनेर उपनिबंधक कार्यालय यांचे एक पथक,जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने अचानक दोन्ही सावकारांच्या घरी अचानक धाड टाकली आहे.सबंधित सावकारांची कसून चौकशी सुरु आहे.चौकशी अंती काय होतंय. सबंधित कुटुंबाला न्याय मिळणार का.? सबंधित सावकारांवर कारवाई होणार का.? या घटनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.तर साकुर गावासह जिल्ह्यातील खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहे.
सावकरकीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा विचार डोक्यात आलेल्या कुटुंबाने यापूर्वी लोणी तेथे एका डॉक्टरची भेट घेऊन किडनी विकण्याचा देखील विचार केला होता. त्यानंतर ते मला भेटले.त्यांची व्यथा खूप भयंकर असून पीडित कुटुंब या सावकारांच्या व्याजापाई रस्त्यावर आले आहे.तरी देखील त्यांचा जगण्याचा आधिकार हिसकावून घेतला जात असल्याचे समोर येतंय.या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या पुरोगामी पत्रकार संघाचे अन्याय अत्याचार निवारण समितीच्या नात्याने त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.माझा प्रशासनावर विश्वास आहे.त्यांना नक्की न्याय मिळेल.
स्वाती सुंभे सामाजिक कार्यकर्त्या
खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून वाकचौरे कुटूंबाची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगीची मागणी

0Share
Leave a reply