Disha Shakti

सामाजिक

कासराळी थंड पाणपोईचे उद्घाटन, तहानलेल्यांची तहान भागणार

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार  : बिलोली तालुक्यातील कासराळी येथे दिवंगत माजी आमदार स्वर्गीय गंगारामजी ठक्करवाड साहेब यांच्या स्मरणार्थ थंड पाणपोई चे उद्घाटन देगलूर बिलोली विधान सभेचे विस्तारक नागनाथ पाटील माचनुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या उन्हाची तीव्रता जाणवत आहे. शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते, या अनुशंगाने कासराळी येथील बस स्टँड परिसरात थंड पाणपोई चे सुरूवात करण्यात आले. लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी पाणपोई सुरूवात करण्यात आले.

तहानलेल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्दात हेतूने ठक्करवाड परिवार व ठक्करवाड मित्र मंडळाच्या वतीने थंड शुद्ध पिण्याच्या पाण्याचे उदघाटन विधानसभेचे विस्तारक नागनाथ पाटील माचनुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा जिल्हा सरचिटणीस ओबीसी आबारावजी संगनोड, राजेंद्र रेड्डी तोटावाड जिल्हाध्य अदिवासी मोर्चा, सरपंच प्रतिनिधी संभाजी टोम्पे,बसवंत पाटील कासराळीकर, शेषराव लंके,ग्रामपंचायत सदस्य साईनाथ गंगुलवार, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील शिंदे ,रामचंद्र गंगुलवार, बालाजी मुनलोड, माधव इबितवार सामाजिक कार्यकर्ते जनार्धन ठक्करवाड, संजय ठक्करवाड, कैलास शिखरे, लक्ष्मण इजुलकंठे, पत्रकार बांधव, गामस्थ मंडळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!