Disha Shakti

शिक्षण विषयी

आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा Graduation day चे आयोजन…

Spread the love

सटाणा प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल, सटाणा येथे सिनियर के.जी. च्या विद्यार्थ्यांचा Graduation day चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या *मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या महिला संचालिका श्रीम.शालनताई सोनवणे, बागलाण तालुक्याचे तहसिलदार श्री. कैलास चावडे साहेब,शालेय समितीचे अध्यक्ष सुनिल दादा सोनवणे, अरुण दादा सोनवणे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वैशाली सोनवणे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवर व पालक यांच्या हस्ते सरस्वतीमातेला पुष्प पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. आजचा हा आगळा-वेगळा कार्यक्रम इयत्ता सिनियर केजी तून पहिलीच्या वर्गात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण होता. यात नर्सरी ते सिनियर के.जी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.लहान अशा चिमुकल्यांनी आपल्या नर्सरी, ज्युनिअर, सिनियर या वर्गामध्ये झालेल्या विविध घडामोडींचे वर्णन आपल्या भाषणातून व्यक्त केले. या लहान चिमुरड्यांनी अतिशय उत्कृष्ट असे नृत्य देखील प्रमुख अतिथी समोर सादर केले.

 या कार्यक्रमाचे नियोजन व सजावट श्रीम.माधुरी अहिरे, पुनम विरगावकर, निकिता भामरे, वैष्णवी देवरे यांनी अतिशय उत्कृष्ट असे केले होते. विद्यार्थी ग्रॅज्युएशन ड्रेसमध्ये अतिशय सुंदर असे दिसत होते. त्यात त्यांच्या डोक्यावरील टोपी, कोट हातातील प्रमाणपत्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खरोखरच बघण्यासारखा होता.आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. अविनाश वाघ यांनी केले.

तहसीलदार श्री. कैलास सावडे सरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना अतिशय सुंदर असे मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखून कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!