श्रीरामपूर प्रतिनिधी /इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील अमोल शिवाजी कांबळे हे शेतकरी गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास आपल्या स्वतच्या हुंडाई कंपनीची गाडीतून (एमएच 12 केई 7083) मिरची विकण्यासाठी श्रीरामपूर मार्केट कमिटी येथे जात असताना पाचेगाव फाट्यावरून श्रीरामपूर कडे साधारण एक किलोमीटर अंतरावर समोरून श्रीरामपूर कडून भरधाव वेगाने येणार्या गाडीच्या तीव्र प्रकाशाने पुढे काही न दिसल्यामुळे तसेच पुढील टायर अचानक फुटल्याने गाडीने शेजारच्या शेतात महावितरणच्या विजेच्या खांबाला धडक देत आंब्याच्या झाडावर आदळली.
गाडी उलटल्यामुळे सर्व दरवाजे लॉक झाले, पण मागील डिकीतून शेतकर्याला बाहेर काढण्यात बाकीच्या मदत करणार्या नागरिकांना यश आले. त्यात गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले. सुदैवाने शेतकर्यांला जास्त मार लागला नसला तरी पाय फ्रॅक्चर झाला असून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Leave a reply