Disha Shakti

क्राईम

व्यापारी राजेशकुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह एक आरोपी शिर्डीतुन अटक, विशेष पथक, गुन्हे शाखा नाशिक यांची कामगिरी

Spread the love

दिशशक्ती नाशिक : सविस्तर हकीकत अशी की विशेष पथकांचे पोउपनि मुक्तेश्वर लाड व पोअं भगवान जाधव, पोना/ भुषण सोनवणे, हे शहरात गस्त करत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळालीकी, म्हसरूल पोलीस ठाणे गु.र.नं 54/2024, कलम 363, 364, 386, 387, 395 भांदवि सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील 20 लाख रूपयेंच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यास मध्यप्रदेशात घेऊन जाऊन 10 लाख रूपये खंडणी घेणा-या टोळीतील, गुन्हा झाल्यापासुन फरार असलेला मुख्य सुत्रधार व त्यांचा साथिदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्यांची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती संदिप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देण्यात आली,

मा. वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी येथे रवाना झाले तसेच शिर्डी  पोलिसांच्या मदतीने गुप्त बातमीतील आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्यांची माहिती मिळतांच पथकाने शिर्डी पोलीसांच्या मदतीने वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारपुस करता त्यांनी त्यांचे नावे 1) शिवा रविंद्र नेहरकर, वय 23 वर्ष, रा. महाजन यांच्या घरात भाडोत्री, नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवल, उत्तम नगर, सिडको, नाशिक, 2) शुभम नानासाहेब खरात, वय 25 वर्ष, रा. संतोषी माता नगर, सयोग रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपुर MIDC, नाशिक आरोपी असे सांगीतले त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस करता वर नमुद गुन्हा केल्यांची कबुली देऊन, गुन्हा केल्यापासुन फरार झाल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यांचा पुढील तपासकामी म्हसरूल पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु हा असुन तो गुप्ता यांचे दुकानात कामाला होता, शिव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरनाचा कट रचला होता.

सदरची कामगीरी मा.श्री. संदिप कर्णिक (पोलीस आयुक्त) सो, मा.श्री. प्रशांत बच्छाव सौ (पोलीस उप आयुक्त गुन्हे), मा. श्री. संदिप मिटके सो (सपोआ गुन्हे), सपोनि श्री. ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि श्री. मुक्तेश्वर लाड, श्रेपोउनि दिलीप भोई, पोह/106 किशोर रोकडे, पोना/911 दत्ता चकोर, पोना/1533 रविंद्र दिघे, पोना/497 भुषण सोनवणे, पोअं/2389 भगवान जाधव, पोअं/869 अनिरूद्ध येवले, सर्व नेमणुक विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!