Disha Shakti

इतर

कष्टकरी व शेतकऱ्यानां न्याय न मिळाल्यास टिळकनगर येथील डहाणूकर इंडस्ट्रीजच्या विरोधात आंदोलन छेडणार – डॉ.मकासरे

Spread the love

श्रीरामपूर विशेष / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील डहाणूकर इंडस्ट्रीजच्या लाल केमिकलयुक्त पाण्यामुळे बेलापूर बु.,दिघी रोड परिसरातील शेती नापीक झाली असून शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. तसेच पिण्यासाठी खराब पाणी येत असल्याने गोरगरीब कुटुंब हतबल झाले आहे.त्यामुळे येथील नागरिक श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे उपोषणास बसले असून आज ८ दिवस उलटले तरी प्रशासन या उपोषणाची दखल घेत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांनी या उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाठींबा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत डॉ.मकासरे यांनी म्हटले की, श्रीरामपूर येथील प्रदुषणग्रस्थ भागात राहत असलेले शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्या टिळकनगर इंडस्ट्रीज मधून लाल केमिकलयुक्त पाणी येत असल्याने विहीर-बोअर यांचे पाणी खराब झाले असून जमीन सन १९९७ सालापासून नापीक झालेल्या आहेत. दुषित पाण्यामुळे जनावरे आजारी पडून मृत्युमुखी पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते तसेच सदर भागातील रहिवाशी देखील प्रदुषण व दुषीत पाण्यामुळे सतत आजारी पडत असतात. लहानमुलांना तसेच वयोवृद्ध माणसांना सतत शारीरीक समस्या निर्माण होत असतात. त्यांच्या आरोग्यात आपल्या कंपनीमुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे या कुटूंबांना नुकसान भरपाई मिळावी. प्रदुषणग्रस्थ भागात राहात असलेले शेतकरी यांना टिळकनगर इंडस्ट्रीजमध्ये प्राधान्याने कायमस्वरूपी कामावर घ्यावे. मुजोर कंपनी मालक व व्यवस्थापन यांनी जर याकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन कंपनीच्या गेटवर आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ.मकासरे यांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!