राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस ठाणे गुरनं 698/2024 भादवि कलम 363 प्रमाणे दाखल गुन्हयातील महिला फिर्यादी यांनी राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असून त्यांची अल्पवयीन पीडित मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली आहे वगैर मजकुराच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी गुन्हयातील अल्पवयीन पीडित मुलीचा शोध घेत असताना तिस प्रवीण बाबासाहेब कोहकडे रा.मोमीन आखाडा तालुका राहुरी याने पळवून नेले बाबत माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेत असताना ते राहुरी फॉरेस्ट, भांगडा डोंगरात लपून बसले बाबत माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेत असताना पीडित मुलगी मिळून आली. सदरील आरोपी डोंगरातील झाडांचा फायदा घेऊन पळून गेला आहे सदर गुन्ह्यास पीडितेच्या जबाबदावरून 376, 366 तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कलम वाढ करण्यात आली असून आरोपीचा शोध घेऊन अटक करत आहोत नमूद गुन्ह्याचा तपास सपोनि पिंगळे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सपोनि पिंगळे पोलीस हवा.आवारे, जायभाय, मपोहवा. कोळेकर, पोना कोकाटे, पोशि रवी पवार, चेमटे,मपोशि नाचन ,सोळसे यांनी केली आहे.
Leave a reply