श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायतअत्तार : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा महादेव शाळेच्या वतीने महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षा २०२४ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला आहे.यावेळी सहा गुणवंत विद्यार्थीनी आपले यश प्रदान केले आहे.तसेच कु .धावरे ईश्वरी सुधीर इयत्ता दुसरी मध्ये हिने प्रथम क्रमांक मिळविला. राऊत पायल राहुल इयत्ता दुसरी हिने प्रथम क्रमांक. राऊत वैष्णवी यतीश इयत्ता तिसरी हिने तृतीय क्रमांक मिळविला. शेख तेहसीन जावेद इयत्ता तिसरी हिने चौथा क्रमांक. राठोड प्रगती हार्षल इयत्ता तिसरी हिने चौथा क्रमांक. वाघमारे आशा जयकुमार इयत्ता चौथी हिने चौथा क्रमांक मिळविला. ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे अध्यक्ष संजीवन दिवे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर. तसेच शुभहस्ते. मा श्री अनिल काळे सहायक राज्यकर आयुक्त नाशिक श्रीमंती लीना परदेशी सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीरामपूर.तसेच कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती .गुळे सर सौ.बढे मॅडम सौ जमदाडे मॅडम श्रीमंती सय्यद मॅडम, मणगे सर, मार्गदर्शक शिक्षक श्रीमती सय्यद नसरीन श्रीमंती तुरे मॅडम.श्रीमती लोहकरे मॅडम श्रीमंती उबाळे मॅडम सदर ह्या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन गणेश पिंगळे सर यांनी केले. आयोजन श्री व सौ घोडलकर सर व श्री आहेर सर यांनी आभार मानले. यांच्यासह आदि पदाधिकारी व विद्यार्थीनी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Homeशिक्षण विषयीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा महादेव महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षा.गुणगौरव सत्कार समारंभ संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा महादेव महात्मा फुले प्रज्ञाशोध परीक्षा.गुणगौरव सत्कार समारंभ संपन्न

0Share
Leave a reply