प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील अंमळनेर गावचा विकासासाठी या अगोदरही माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला असुन अनेक लोकाभिमुख कामं मार्गी लागले असून या पुढे हि भरघोस निधी देण्यात येणार असल्याचं माजी जिल्हापरिषद बांधकाम समितीचे सभापती लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांनी बेंद वस्ती एक किलोमीटर खडिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपसरपंच अशोकराव मोरे यांचा वस्ती वरील कार्यक्रम प्रसंगी गडाख बोलतं होते.
आजपर्यंत नेवासे तालुक्यात आनेक आमदार होवून गेले आपल्या मतावर निवडून गेले.विकास झाला नाही आमदार शंकरराव गडाख यांना पाच वर्ष आमदारकी मिळाली.त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार मध्ये जलसंधारण कॅबिनेट मंत्री मिळाले. मोठ्या प्रमाणावर तालुक्याचा विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला कामाचा धडाका सुरू होत असताना भाजपाने फोडाफोडी राजकारण करून ठाकरे सरकार पाडलं सर्वात जास्त नुकसान आपल्या तालुक्याचे झाले.
भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूध, कांदा, घरगुती गॅस पेट्रोल डिझेल प्रश्नी नेहमीच दुटप्पी भूमिका घेवून प्रचंड नुकसान सामन्यांच झाले. खताच्या वाढलेल्या किमती मुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाजपा विषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला असून लोकसभेसारखी अवस्था भाजपाची होणार असून पुन्हा ठाकरे सरकार महाराष्ट्रात येणार असल्याचा विश्वास गडाख यांनी व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच अशोकराव मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांना प्रचंड मताधिक्य मिळणार असून गडाख परीवार आपल्या हक्काचे असून पुन्हा शंकरराव गडाख हे राज्यात मंत्री होणार असल्याचे सांगून लोकनेते सुनिलभाऊ यांचाकडे काही काम घेवून जा नाही म्हणत नाही.त्यामुळे वयक्तिक कामाबरोबरच सार्वजनिक काम मार्गी लागत आहे.
या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब माकोणे,मुळाचे माजी संचालक कर्णासाहेब पवार, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, तानाजी घावटे, चंद्रकांत माकोणे, हभप संपत महाराज पवार, पोलीस पाटील अनिल माकोणे, निंभारीचे पोलीस पाटील संतोष पवार,माजी सरपंच अच्युतराव घावटे, लक्ष्मण धात्रक, पंढरीनाथ कोळेकर, सोमनाथ माकोणे,राजू सुपनर, शिवाजी सुपनर, शिवाजी आयनर, सोपान सुपनर, गोरक्षनाथ सुपनर, लक्ष्मण बोरुडे, अनंत घावटे, राजेंद्र माकोणे, दत्तात्रय बाचकर, बाबासाहेब धात्रक,ठकाजी कोळेकर, एकनाथ घावटे,भागवत आयनर, बलभिम घावटे,संदिप तमनर,रायभान माकोणे, प्रताप आयनर, माऊली माकोणे, अविनाश रोकडे, किरण जाधव,ओम घावटे, काशिनाथ आयनर,राऊसाहेब जिवरक, अजित पवार, गंगाधर पवार, बाळासाहेब बोरुडे ,बाळासाहेब मोरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक प्रा.दशरथ आयनर, सुत्रसंचालन- रामेश्वर घावटे आभार- लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर यांनी मानले.
अंमळनेर गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – लोकनेते गडाख
Disha ShaktiJuly 28, 2024
posted on

0Share
Leave a reply