विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार निलेश लंके यांना महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंकेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यांच्या विरोधात महायुतीतर्फे विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे, काशिनाथ दाते यांची नावे चर्चेत येत आहेत. याचवेळी डॉ. श्रीकांत पठारे ही पारनेर विधानसभा लढविण्याची तयारी करीत आहेत.
या मतदारसंघाचा विचार करता विद्यमान खासदार निलेश लंके हे कागदावर आजच्या घडीला तरी भक्कम दिसत असले तरी विधानसभेला पुन्हा लंके कुटुंबातीलच व्यक्ती असल्यामुळे तालुक्यात (शिवसेना उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडीकडून त्यांना मदत होताना दिसत नाही. दुसरीकडे महायुतीतर्फे सुजित झावरे पाटील मतदारसंघात फिरत असून, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. सुजित झावरे पाटील यांची या विधानसभा मतदारसंघात जवळपास ५० हजार मते निश्चित मानली जात आहेत. तसेच चारही उमेदवारांच्या मागिल व आत्ताच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला असता या बाबीसमोर येत असताना दिसून येते आहेत. तर महायुतीतर्फे पारनेर विधानसभा निवडणुक लढवण्यास काशिनाथ दाते ही इच्छुक आहेत. काशिनाथ दाते यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर प्रशांत गायकवाड हे सक्षम उमेदवार म्हणून नाव चर्चेत असून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
राणीताई लंके
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात ६० हजार हक्काची मते, दोन वेळा जिल्हा परिषदेचा अनुभव, मजबूत संपर्क यंत्रणा, निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी घरोघरी परिचय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फायदा, इच्छुक उमेदवारांवर नाराज असलेल्या मतदारांना समजावण्याची क्षमता.
सुजित झावरे पाटील
हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले याचा अनुभव. तर २०१४ साली पारनेर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात ७३२६३ मते मिळाली. सुजित झावरे पाटील यांना ४५८४१ हजार मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. आज घडीला पाहिले तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कै. माजी आमदार वसंतराव झावरे यांचे पुत्र असल्याने सुजित झावरे यांना फायदा होण्याची शक्यता. आई सुप्रियाताई झावरे जिल्हा परिषद सदस्य आणि स्वतः जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असल्याने काम केल्याचा राजकीय अनुभव. तरुण चेहरा असल्याने फायदा होण्याची शक्यता. सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठा जनसंपर्क तरुणांची मोठी फळी सोबत.
काशिनाथ दाते
जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य अनुभवाच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकासकामे केल्याचा फायदा. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आणि महायुतीत संवाद चालू असून त्याद्वारे मतदारसंघात चर्चेत नाव, प्रतिस्पर्धी इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत प्रभावी व शक्यमय पर्याय म्हणून काशिनाथ दाते सर यांच्याकडे पाहिले जात आहे. सहकार व समाज चळवळीत मोठें योगदान दिले असून पक्षाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रात चांगले काम व दांडगा अनुभव.
विश्वनाथ कोरडे
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सध्या राष्ट्रीय भाजप नेते कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी महायुतीत सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारसंघात राबविल्या आहेत. महसूल व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू सहकारी या माध्यमातून पारनेर तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. देशातील व राज्यातील महायुतीचे सरकार मधील नेत्यांचा संपर्क असल्याने मंत्रालयातील कामांचा अनुभव. यामाध्यमातून मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे. आढावा बैठक,गावभेटी, माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न. या सर्व कामांच्या जोरावर विधानसभा लढविण्यासाठी चर्चेतील प्रमुख नाव.
Leave a reply