दौंड तालुका प्रतिनिधी /सुधीर प्रभाकर लोखंडे : दि १७. खानवटे ता. दौंड. या गावचे दोन अवलिया गायक श्री वसंत उत्तम लोखंडे व श्री.सचिन अंकुश महाडिक ही जोडगोळी आपल्या मधुर गायनाने खानवटे गावातील व पंचक्रोशीतील लोकांना आपल्या सुमधुर गायन वाणीतून लोकांना मंत्रमुग्ध करत आहेत , सचिन वसंत या जोडगोळीची मधुर गायनाची छाप हळूहळू तालुका भर पसरू लागले आहे.
हे दोन अवलिया गायक हिंदू संस्कृतीतील सणावारा दिवशी व इतर वेळी आपल्या गायनाची जादू लोकांवर करतात यामध्ये महाशिवरात्री, नागपंचमी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, दिवाळी, हनुमान जयंती, इत्यादी सणावारा दिवशी व इतर वेळी आपल्या गायनाची कला सादर करतात, व त्यांच्याबरोबर आपल्या मित्रमंडळींना ही सहभागी करून घेतात , त्यांची ख्याती दिवसेंदिवस वाढत जावो हीच मित्र जनांची विठुराया चरणी प्रार्थना व माननीय खासदार सुप्रियाताई सुळे ता. बारामती यांच्या तर्फे भजन स्पर्धेत उत्कृष्ट गायन केल्याबद्दल सचिन वसंत जोड गोळीला पुणे या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता .
Leave a reply