विशेष प्रतिनीधी /इनायत अत्तार : नेवासा व भिंगार परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारा राहुरी येथील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोपट लक्ष्मण नरोडे (वय 42, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्याने नेवासा, भिंगार कॅम्प व सोनई पोलीस ठाणे हद्दीत चार ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केले असल्याची कबूली दिली आहे. चार गुन्हे उघडकीस आले आहेत. जिजाबाई कारभारी बुळे (रा. मजले चिंचोली, ता. नगर) या 5 ऑगस्ट रोजी पतीसह दुचाकीवरून हंडी निमगाव (ता. नेवासा) येथे जात असताना अनोळखी व्यक्तीने त्याचे वाहन थांबवून तुम्ही माझ्या आईच्या अंगावर का थुंकला ? असे म्हणुन जिजाबाई यांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबडून नेले होते. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, सागर ससाणे व मेघराज कोल्हे यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील संशयित आरोपी पोपट लक्ष्मण नरोडे याने केला असून तो मोगरा हॉटेलजवळ, तपोवन रस्ता, नगर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सदर ठिकाणी सापळा लावुन संशयीतास ताब्यात घेतले. त्याने त्यांचे नाव पोपट लक्ष्मण नरोडे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता नेवासा, भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करून चोरी केलेले सोन्याचे दागिने शनी चौक, राहुरी येथील सोनारास विक्री केल्याची माहिती दिली. नेवासा पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.
नेवासा, भिंगारमध्ये चैन स्नॅचिंग करणारा राहुरीच्या सराईत गुन्हेगाराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

0Share
Leave a reply