इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : दिनांक 14 नोव्हेंबर 2024 वार गुरुवार या दिवशी स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरा केली जाते याचे औचित्य साधून विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल येथे बाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्री प्रायमरी मधील विद्यार्थ्यांनी चाचा जी ची वेशभूषा करून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली तर काही नेत्यांच्या गीतांची गायन केले तसेच बाल दिनाच्या निमित्ताने अनेक गाण्यांवर नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता वाघ मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला स्कूलच्या प्राचार्या सौ वंदना थोरात मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी करण्यात आली हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री बापूराव थोरात सचिव श्री विजय भैय्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण येथे बालदिन उत्साहात साजरा

0Share
Leave a reply