Disha Shakti

राजकीय

पालकमंत्री विखे पाटील यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद, लाडक्या बहिणींना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी  / इनायत अत्तार : महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू केल्याने महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत. यामुळे महिला महायुती सरकारवर जाम खुश आहेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रचार दौऱ्यावर येथे आले असता लाडक्या बहिनींनी त्यांना अक्षरशः गराडा घातला. यावेळी त्यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी पालकमंत्र्यांनीही त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी आज श्रीरामपूर दौरा करत विधानसभेतील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव व उंदीरगाव येथे जाहीर प्रचार सभा घेतल्या. या तीनही ठिकाणी लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण करत जोरदारपणे स्वागत केले. लडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. यावेळी अनेक महिलांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्यासोबत आपले फोटो सेशनही केले.

लाडक्या बहिणीशी संवाद साधताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महायुती सरकारने मुख्यमंत्री लडकी बहीण योजना सुरू करून त्यांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू केली. महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपयेपर्यंत या योजनेचे पैसे मिळाले आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 70 हजार रुपये महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर ही रक्कम पंधराशे वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिनींनी आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले.

यावेळी आमदार कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस फारुक पटेल, तालुका समन्वयक किशोर पाटील बकाल, राज्य प्रतिनिधी सुनील थोरात, जिल्हा परिषदचे माजी सभापती शरद नवले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, आदिवासी संघटनेचे नेते शिवाजी गांगुर्डे, गणेश मुद्गुले, भाऊसाहेब बांद्रे आदिसह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!