Disha Shakti

सामाजिक

दत्तात्रय अणदूरकर सामाजिक संस्थेचा आदर्श सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ जळकोटे यांना जाहीर

Spread the love

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हंगलगुंडे : अणदूर येथील दत्तात्रय अणदूरकर सामाजिक संस्थेचा आदर्श सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कार या वर्षी केशेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ जळकोटे यांना जाहीर झाला असून रविवार दि 8 डिसेंबर रोजी,सायंकाळी 4 वाजता केशेगाव,तालुका तुळजापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे तरी शिक्षण प्रेमी नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पत्रकार श्रीकांत अणदूरकर यांनी केले आहे.

दत्तात्रय अणदूरकर सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी हाडाचे शिक्षक कै. दत्तात्रय अणदूरकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे हे 8 वे वर्ष असून ‘शिक्षक हा कधीच सेवानिवृत्त होत नसतो त्याच्यातील ऊर्जा ही सेवानिवृत्त नंतर ही समाजाच्या उपयोगी पडावी प्रत्येक सेवानिवृत्त शिक्षकाने आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर ही विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य वेगवेगळ्या प्रकारे तसेच पुढे चालू ठेवावे जेणेकरून समाजातील विद्यार्थी घडतील’ या उदात्त हेतूने संस्था प्रतिवर्षी हा पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षकाला प्रदान करते यंदा चा पुरस्कार कडक शिस्तीचे शिक्षक नागनाथ जलकोटे यांना देण्यात येणार आहे, तरी या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!