श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच दिगंबर शिंदे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. या जागेसाठी नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले. यामध्ये प्रितीश केशव देसाई यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे अध्यासी अधिकारी तथा सरपंच नंदा अहिरे यांनी जाहीर केले. निवडणूक झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे उपसरपंच दिगंबर शिंदे यांनी दि. २३ नोव्हेंबर रोजी आपला राजीनामा दिला होता. त्यांच्या अर्जाची छाननी ४ डिसेंबर रोजी झाली त्यानंतर दि. १३ डिसेंबर रोजी उपसरपंच निवडीचा अजेंडा काढण्यात आला.
त्यानुसार काल बुधवार दि. १८ रोजी नामनिर्देशन मागविण्यात आले. त्यामध्ये एकमेव अर्ज प्रितीश केशव देसाई यांचा आला. त्यांच्या नावाची सूचना दिगंबर कचरू शिंदे यांनी मांडली.यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदा अहिरे, मावळते उपसरपंच दिगंबर शिंदे, हाजी मुसाभाई पटेल, नंदा त्रिभुवन, अनिता शिंदे, हिराबाई भवार, प्रितीश देसाई, स्वाती वाघचौरे, शिल्पा गहिरेआदी सदस्य उपस्थित होते.
अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच नंदा अहिरे यांनी तर सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी काम पाहिले. त्यांना कर्मचारी किशोर त्रिभुवन व किशोर देसाई यांनी सहाय्य केले. उपसरपंच प्रितीश देसाई यांच्या निवडीनंतर गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी माजी सरपंच प्रतापराव देसाई, वसंतराव शिंदे, माणिकराव देसाई, भास्करराव शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक गोकुळ देसाई, रामसिंग गहिरे, सुरेश देसाई, युनुस पटेल, चंद्रकांत देसाई, गंगाधर देसाई, डॉ. सोपान वाघचौरे, प्रताप शिंदे, बापूसाहेब देसाई, कचरू त्रिभुवन, सोपान गायकवाड, आबासाहेब देसाई, माजी सभापती पी. आर. शिंदे शिक्षक सोन्याबापू शिंदे, अरूण शिंदे, नारायण वाघचौरे, सोमनाथ गहिरे आदींनी अभिनंदन केले.
Leave a reply