Disha Shakti

शिक्षण विषयी

विद्यार्थी.. शिक्षक.. अन् आता मुख्याध्यापक, गोपाळ कुलकर्णी यांची उत्तुंग भरारी ;  संस्थेच्या विश्वासार्ह पाठबळामुळे मिळाले बळ

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : देव देतो पण त्याला कर्माची सांगड व जोड घालावी लागते. हे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे असे आजही समाज माणसात कुतसीतपणे ऐकावयास मिळते. मात्र काही जणांच्या जीवनात मात्र प्रत्यक्षात पहावयास मिळाल्यास आश्चर्य वाटू नये म्हणजे झाले.
त्याचे झाले असे विशेषतः गोपाळ बाबुराव कुलकर्णी हा येथील रहिवासी जवाहर विद्यालयाचा विद्यार्थी, पुन्हा शिक्षक, आता मात्र मुख्याध्यापक हा अचंबित करणारा प्रवास निश्चितच प्रेरणादायी व प्रत्यक्षात पहावयास मिळाल्याने ग्रामस्थातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव करताना पाहावयास मिळत आहे.

मराठवाड्याचे साने गुरुजी म्हणून शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ नावलौकिक असलेले ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून 1952 मध्ये शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याचे आज वटवृक्षात रूपांतर पहावयास मिळते. तुळजापूर तालुक्यासह मराठवाड्यात शिक्षणाचे जाळे निर्माण करण्याची न भूतो किमया स्वर्गीय आदरणीय शिक्षण महर्षी, सि.ना.आलू रे गुरुजींनी केले हा इतिहास निश्चितच प्रेरणा व दिशा देणारा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. याच संस्थेतून सचिन हराळकर दहावी शालांत परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा उच्चांक निर्माण केला. ग्रामीण भागही राज्य स्पर्धेत मागे नसल्याचा इतिहास निर्माण करून दाखवला हेही विसरता येणार नाही.

आज घडीला जवाहर विद्यालयात अडीच हजार विद्यार्थी ज्ञानदान घेत असून संस्था अंतर्गत दहा शाळा, वस्तीग्रह. कर्मचारी कार्यरत असून दुरितांचे तिमिर जावो हे संस्थेचे ब्रीद आहे. 1980 ते 85 म्हणजे पाचवी ते दहावी येथेच शिक्षण झाले, 1992ते 2021 संस्थेअंतर्गत केशेगाव येथील शाळेत सहशिक्षक ते उपमुख्याध्यापक अशी यशस्वी कारकीर्द त्यांनी केले गेले तीन वर्षापासून जवाहर विद्यालय उपमुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक आता मात्र संस्थेच्या विश्वासार्ह पाठबळामुळे मुख्याध्यापकाचे जबाबदारी निश्चितच भूषणावह आहे हे मात्र निश्चित.
1985 मध्ये आम्ही दहावी अ मध्ये शिक्षण घेत होतो मुख्याध्यापक स्वर्गीय माने गुरुजी होत. त्यावेळी मॉनिटर अर्थात वर्ग प्रतिनिधी म्हणून गोपाळ काम करायचा अभ्यासाच्या व्यासंगामुळे ती जबाबदारी माझ्यावर सोपवून बिनधास्त झाला.

त्यावेळी श्रीमंत मुळे गुरुजी, महादेव नरे गुरुजी, नवनाथ संगशेट्टी गुरुजी, भगीरथ उर्फ नाना गुरुजी, स्वर्गीय कुंभार गुरुजी, कदम गुरुजींचा धाक आणि ज्ञानदानामुळे असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक करताना दिसतात. त्यातीलच एक म्हणजे गोपाळ कुलकर्णी. साधी राहणी उच्च विचारसरणी, उत्तम, कुशल संघटन कौशल्याच्या बळावर विशेषतः संस्थेच्या विश्वासाच्या बळावर त्यांची पदोन्नती संस्थेला पाठवा देणारी असून गावचा रहिवासी, विद्यार्थी, शिक्षक, उपमुख्याध्यापक आता मात्र मुख्याध्यापक हा प्रसंग योगायोगाने येतो तोही ऐतिहासिक व दुग्ध सरकरायुक्त ठरावा हे विशेष.
मराठवाड्यात निशुल्क ज्ञानदान हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणारी ,सत्यम.. शिवम… सुंदरम अशी ओळख असलेल्या संस्थेचा निस्वार्थ व अलौकिक कार्य स्वर्गीय
वंदनीय आलूरे गुरुजींच्या नेतृत्वाखाली गावचे प्रथम नागरिक तथा संस्थेचे सचिव रामचंद्र दादा आलूरे करताना दिसतात.
आदर्श संस्थेचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून आपली कारकीर्द यशस्वी होवो. आपल्या भावी यशस्वी वाटचालीस दिशाशक्ती न्यूज च्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा….


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!