Disha Shakti

राजकीय

केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसींग चौहान यांनी घेतले सहकुटुंब साई व शनीदर्शन

Spread the love

दिशाशक्ती / ज्ञानेश्वर सुरशे : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व सद्याचे गाकेंद्रिय कृषी मंत्री शिवराजसींग चौहान यांनी आज शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेतले व सायंकाळी काही वेळापूर्वी शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले मंत्री शिवराजसींग चौहान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की नित्यनियमाने दरवर्षी नवीन वर्षात 1 जानेवारी रोजी साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सह कुटुंब येत असतो परंतु 1 जानेवारी रोजी काल महत्वाची केंद्रिय कॅबीनेट बैठक होती व ती बैठक शेतकऱ्यां विषयी महत्वाची त्यामुळे साईबाबा यांनी आधी कर्तव्य पार पाडा व उद्या माझ्या दर्शनासाठी या असे आदेश साई बाबांनी आपल्याला दिले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .

आज दुपारी त्यांचे शिर्डी विमानतळ येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर त्यांनी दुपारी साईबाबा यांचे दर्शन घेतले व सायंकाळी शिंगणापूर येथे येऊन शनीदर्शन घेतले असून ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असताना दरवर्षी नववर्षी 1 जानेवारी शिर्डी व शनीशिंगणापूर ला दर्शन घेत असत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!