श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 23/01/2025 रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान, नाऊर गावाच्या शिवारात माजी उपसरपंच श्री दिगंबर शिंदे यांच्या वस्तीजवळ गट क्रमांक 212 येथे गोरख राशिनकर आणि कुणाल देसाई यांच्यावर बिबट्यानं अचानक आक्रमण केले,त्यात गोरख राशिनकर हे दोन चाकी गाडीवर मागे बसले असता बिबट्याने त्यांच्या पायास जोरदार पकडले,तेव्हा तेथे पडलेली विटकर उचलून बिबट्याला फेकून मारली आणि गोरख राशिनकर हे बिबट्याच्या जबड्यातून सुदैवाने सुटले,
त्यापुढे त्यांना अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यामध्ये आपणास असे दिसते कि वन विभागाच्या एका अधिकाऱ्यास दूरध्वनीवरून संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्याने कुठलेही उत्तर दिले नाही, यामध्ये आपणास असे दिसते की वन विभागाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडण्यास अकार्यक्षम आहे, आणि सामान्य नागरिक रात्री बे रात्री आपली शेतीचे कामे करून येत असताना आणि तालुक्यातून परत घरी जात असताना त्यांच्या जीवास हिंसक प्राण्यांपासून धोका निर्माण होतो आणि यासाठी वन विभागाचे अधिकारी पूर्णपणे जबाबदार आहेत.
Leave a reply