विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण: जिल्ह्यातील अभ्यासू, जाणकार, शिस्तप्रिय,परखड व स्पष्टवक्ते अशी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांची ख्याती आहे. त्यांचा आजही जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पारनेर तालुक्यातील राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो.
पारनेर मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाचा उमेदवार आमदार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून म्हणावं तशी संधी अद्याप दिलेली नाही. सुजित झावरे पाटील यांचे पुनर्वसन होणे आता गरजेचे आहे. पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन पारनेर तालुक्यातील वासुंदे येथिल सुजित पाटील यांची महामंडळावर किंवा शिर्डी संस्थानवर त्यांची वर्णी लावावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
जिल्ह्यातील जाणकार नेत्यांनी सुजित झावरे पाटील यांचा पक्ष व काही नेत्यांच्या शब्दासाठी घेतलेल्या मेहनतीचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता सर्वच नेत्यांनी एकत्र येत सुजित झावरे पाटील यांची महामंडळावर किंवा एखाद्या शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद देऊन त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करावा, अशी मागणी होत आहे. सुजित झावरे पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत जेष्ठ नेत्यांचे ऐकून उमेदवारांना मदत केलेली आहे. त्यांच्या मदतीने काशिनाथ दाते आमदार झाले आहेत. यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी पुढाकार घेऊन सुजित झावरे पाटील यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून त्यांच्या कामाचा सन्मान होण्याची गरज असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर कायमच अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर करणे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती आहे. याही वेळेस पारनेर विधानसभेसाठी उमेदवारीला त्यांचा दावा होता. परंतु काशिनाथ दाते यांना उमेदवारी देऊन सुजित झावरे यांना थांबविण्यात आलेले आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत गेलेला आहे. हा अन्याय दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी झावरे पाटील यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. हे पुनर्वसन करताना त्यांना शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद द्यावे किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे.
— किसन धुमाळ, कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्ट,माजी विश्वस्त
वासुंदेच्या सुजित झावरे पाटील यांचे पुनर्वसन करा : पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी

0Share
Leave a reply