Disha Shakti

Uncategorized

कोंढाळी नागपूर मार्गावर भीषण अपघात 5 महिन्याच्या मुलासह आई आणि वडिलांचा मृत्यू, 8 महिन्याची चिमुरडी पोरकी ह्रदय हेलावून टाकणारी घटना

Spread the love

  1. प्रतिनिधी : कोंढाळी-नागपूर मार्गावर शिवा फाट्या नजीक एका कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात कार चालक वडिलासह 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर  पत्नी गंभीर जखमी आहे. जखमी महिलेला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत अमरावती- नागपूर महामार्गावर शिवा फाट्या जवळ 19 फेब्रवारी रोजी दुपारी हा अपघात घडला. रोशन तागडे (वय 28), राम तागडे(5 महिने) मृतकांची नावं आहे. तर  आचल तागडे (वय 23) व जोया मेश्राम ( वय 8) असे गंभीर जखमींचे त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. आईची प्रकृतीही चिंताजनक होती. मात्र, उपचारादरम्यान आईनेही प्राण सोडले.

    रोशन तागडे हे आपल्या कुटुंबासह कोंढाळी इथं लग्नाला गेले होते. लग्न सोहळा आटोपून नागपूरला परत येत होते. अमरावती-नागपूर महामार्गावर शिवा फाट्याजवळ पोहोचले असता अचानक समोर असलेला  ट्रेलर  थांबविण्यासाठी डावीकडे वळवला. त्यामुळे भरधाव कारने ट्रेलरला मागून जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. जबर धडक बसल्यामुळे कार चालवत असणारे रोशन तागडे आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा रामचा जागेवरच मृत्यू झाला.
    तर अपघातात पत्नी व एक 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली.  जखमींना उपचारासाठी तातडीने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पण, उपचारदरम्यान आईचाही मृत्यू झाला. त्यामुळे आई, बाप-लेकांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!