विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील अगण्य समजल्या जाणाऱ्या नाऊर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिगंबर कचरू शिंदे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली आहे. नाऊर ग्रामपंचायतीच्या सभागृहात नवनिर्वाचित सरपंच सौ.नंदा सुनील अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय आधिकारी नायब तहसीलदार सौ.हेमा वाबळे यांच्या उपस्थीत हि निवड पार पडली.
या निवडीसाठी दिगंबर कचरू शिंदे यांंचा एकमात्र अर्ज आल्याने व सर्वांनी सहमती दर्शविल्याने त्यांची बिनविरोध घोषित करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त सरपंच अहिरे नंदा सुनिल, उपसरपंच दिगंबर कचरू शिंदे, सदस्य पटेल मुसा बाबू, देसाई प्रितेश केशव, अहिरे अनिकेत किशोर, गहिरे शिल्पा रामसिंग, भवार हिराबाई भानुदास, त्रिभुवन नंदा विकास, शिंदे अनिता प्रताप, वाकचौरे स्वाती संतोष या सह आदी उपस्थित होते.
श्रीरामपूर येथील नाऊर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिगंबर कचरू शिंदे यांची बिनविरोध निवड

0Share
Leave a reply