अणदुर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे क्रांती सुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर जन्मोत्सव समिती अणदुर व महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासना च्या आवाहन प्रतिसाद देत प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. युवकासह महीलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसुना आला. रक्तताचा तुटवडा निर्माण झाला आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने रक्तदानाचे आवाहन करण्यात आले त्या प्रतिसाद देत अणदुर येथे 78 बसव भक्तांनी रक्तदान करुन अभिवादन केले.
यावेळी व्हाईस ऑफ मिडिया जिल्हा कार्याध्यक्ष शिवशंकर तिरगुळे, आण्णासाहेब आलुरे,दिपक मुळे, संदीप धुमाळ,सचिन तोग्गी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.बसवेश्वर जन्मोत्सव समिती अणदूर व ब्लड सेंटरच्या वतीने रक्तदात्यांना पाण्याचा जार भेट देण्यात आला. यावेळी श्रीशैल आलुरे, महेश आलुरे, लक्ष्मण मुळे,गिरीष कबाडे, सुभाष कोळी, बसवेश्वर पाटील, ओंकार कर्पे, आकाश आळंगे, महादेव शिवराम, बसवराज भंडारकवठे, अनुरुप कबाडे, आदी उपस्थित होते.महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर कर्मचारी सह बसवेश्वर जन्मोत्सव समिती कार्यकर्ते नी शिबीर यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
Leave a reply