प्रतिनिधी / रमेश खेमनर (25 फेब्रवारी) : राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी बिहाणी विद्यालयाचे शिक्षक श्री. राजेंद्र सोनटक्के यांचे चिरंजीव व डी पॉल या शाळेचा विद्यार्थी चि.संस्कार सोनटक्के याची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्कार चे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी 16 वर्षा खालील वयोगटातील मुले व मुली यांची व्हॉलीबॉल अहमदनगर संघ निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या त्या स्पर्धेत डि पॉल या शाळेतील तीन खेळाडूंची अहमदनगर संघात निवड झाली होती. यामध्ये चि.संस्कार सोनटक्के, शौर्य वाडेकर, आथर्व पाळंदे यांची निवड झाली होती. त्यानंतर बारामती येथे पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धा दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी पार पडल्या त्या स्पर्धेत पुणे विभागाच्या संघात चि. संस्कार सोनटक्के याची निवड झाली आहे.
पुढील राज्यस्तरीय स्पर्धा 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2022 या दरम्यान नागपूर येथे होणार आहे. संस्कार सोनटक्के याची निवड झाल्याबद्दल डि पॉल शाळेचे प्राचार्य फादर समीर, मॅनेजर फादर ए.बी, व सर्व शिक्षक वृंद,पालक व इत्यादींनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
निवड झालेल्या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक तस्लीम सय्यद, राजेश ब्राम्हणे, श्रीमती रोशन वाघमारे इत्यादींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्कार सोनटक्के हा राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर या विद्यालयातील शिक्षक श्री. राजेंद्र सोनटक्के यांचा मुलगा आहे. त्यामुळे विद्यामंदिर विद्यालयातील सर्व शिक्षकांतर्फे संस्कारचे कौतूक करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.