प्रतिनिधी : (नारायण कराळे) दि.07 ऑगस्ट : रोजी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा 2022 चे आयोजन गंगा लॉन्स , भगवान बाबा चौक ,सावेडी करण्यात आले होते . त्या स्पर्धेत छत्रपती अकॅडेमी च्या 23 खेळाडूंनी भाग घेतला होता . त्या स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार आहेत.
सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे अनिल तोडकर ,तेजस रासकर, द्वीज गुंड ,रोहित शिंदे, अविष्कार गुंजाळ, कार्तिक काळे,धनश्री काळे ,श्रेया दरंदले, साक्षकी साळवे, ऋतुजा कदम
रौप्य पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे मोनिका रासकर , ओंकार भंडारी, रितुल जाधव , हरी सानप, कांस्य पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे शाहरुख सहानी ,तन्मय दहिफळे
सर्व पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंना अकॅडेमीच्या वतीने पुढील वाटचालीसाठी विक्रम राजे भगत व अजय महाराज बारस्कर यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.