यवतमाळ प्रतिनिधीं / स्वरूप सुरोशे : महागाव तालुक्यातील पोखरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी शेतकऱ्याने भ्रमणध्वनीद्वारे विचारलेल्या प्रश्नांचा राग आल्याने अभद्र भाषेत शिवीगाळ केल्याने पोखरीचे ग्रामसेवक श्री.अर्जुन हांडे यांच्या शिवीगाळ प्रकरणी प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
शेतकऱ्याशी शिवीगाळ केल्यामुळे फोनवरती ग्रामपंचायत कार्यालय ईजनी, वकान, कोनदरी,पोखरी,पेठी इत्यादी ग्रामपंचायत कार्यालयाचे काम करत होते. नियम (सिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ मधील तरतुती नुसार त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे व त्यांना निलंबित केले आहे.पदग्रहण अवधी, स्वियेतर सेवा, निलंबन आणि बडतर्फी, सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.सदरील कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यावतीने करण्यात आली आहे.