Disha Shakti

Uncategorized

विक्ट्री तायक्वोंदो अकॅडमीचे जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत तायक्वोंदो या खेळामध्ये विक्ट्री तायक्वोंदो अकॅडमीने सहभाग घेऊन संस्कृती वाघे व श्रेयश हुलजुते यांनी सुवर्णपदक तसेच श्लोका हुलजुते व हर्षद लांडगे यांनी कांस्य पदक मिळविली आहेत. सुवर्णपदके पटकावून यांची राज्यस्तरीय तायक्वोंदो स्पर्धेत (जळगांव) येथे निवड झाली आहे. विजयी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक सुमित खंडागळे, स्नेहा देसाई, प्रथमेश जाधव, अरिन कर्माकर, रोहन थिटे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यानां पुढील वाटचालीस शुभेच्छा. विजयी खेळाडूंचे विक्ट्री तायक्वोंदो अकॅडमी यांनी अभिनंदन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!