नाशिक प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : गेल्या महिना दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने गोकुळाष्टमीपासून जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत.एवढेच नव्हे तर गोदावरी नदीलाही पूर आल्याने गोदाकाठ परिसरातील नागरिकांची दाणादाण उडाली आहे. या धडकी भरवणाऱ्या पुरामुळे या परिसरातील मंदिर, घरे, शेतशिवार पाण्याखाली गेल्याने नाशिककरांची दाणादाण उडाली आहे.
या पावसामुळे नाशिककरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पुढच्या चार दिवसात जिल्ह्यात मध्यम पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच असून गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. गंगापूर धरणातून 9000 क्यूसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
नाशिकमधील पुराचं मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत सध्या पुराचे पाणी असल्याचं बघायला मिळत आहे. या परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी शिरलं आहे. तसेच शेतीमध्येही पाणी भरल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढचे चार दिवस नाशिकला मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून प्रशासनासह गोदा घाटच्या नागरिकाना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ नाशिक शहरात सकाळपासून पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आलाय. रामुकंड परिसरातील छोटी छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तब्बल तीन महिन्यांनी गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलीय.
Leave a reply