Disha Shakti

Uncategorized

सविताराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मकाई जिंती सेवा सहकारी सोसायटीवर सविताराजे भोसलेचा झेंडा

Spread the love

 

जिंती प्रतिनिधी / अक्षय वरकड : श्रीमंत शहाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या सविताराजे राजेभोसले यांचे नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती भगतवाडी गुलमोहरवाडी कावळवाडी रामवाडी ग्रुप जिंती मकाई सेवा सहकारी सोसायटीवर श्रीमंत मकाई सहकार शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकला आहे.सर्वात महत्वाची व लक्षवेधी सोसायटीसाठी अतिशय अटीतटीची लढतीत मोठ्या फरकाने सविताराजे राजेभोसले यांच्या पॅनलचा विजय झाला.

श्रीमंत मकाई सहकार शेतकरी विकास पॅनलचे तेरा पैकी तेरा उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.जिंती भगतवाडी गुलमोहरवाडी कावळवाडी रामवाडी या पाच गावची ही सेवा सहकारी सोसायटी आहे.१३ सदस्य असलेली ही सेवा सहकारी सोसायटी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. जिल्हा परिषद सदस्या सविताराजे राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत मकाई सहकार शेतकरी विकास पॅनल करून निवडणूक लढवली.

तेरा पैकी तेरा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी उमेदवारांना मिळालेली मते धेंडे विद्याधर आदिनाथ -293 शेजाळ प्रकाश काशिनाथ-290 कुंभार रामकृष्ण जनार्धन 286 तानवडे सुनंदा दादासाहेब-286 जाधव बजरंग कोंडिबा-281तानवडे जनाबाई दशरथ 273,  गिरंजे तुकाराम शिवाजी-271 , कचरे दादा तुकाराम 266,  रणदिवे पंडित मच्छिंद्र-266 मेरगळ युवराज सोमनाथ-263 वारगड अशोक मारूती-257 केसकर शाम शंकर-248 गायकवाड दत्तात्रय आजिनाथ-248,  असे तेरा सदस्य निवडून आले असून स्पष्ट बहुमत मिळवून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी सविताराजे भोसले यांचेसाठी ही निवडणूक महत्वपूर्ण झालेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!