नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नुकत्याच झालेल्या कृषी बाजार समिती निवडणुकीत सुहास अण्णा कांदे व ज्येष्ठ नेते श्री बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी पॅनल विजय झाले होते. नांदगाव कृषी बाजार समितीमध्ये नवनिर्वाचित सभापती व उपसभापती पदाची निवड संपन्न झाली सभापती पदी अर्जुन बंडू पाटील व उपसभापतीपदी पोपट सानप यांची एक मतांनी निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री बापूसाहेब कवडे तालुक्याचे आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांनी सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी शिवसेना पदाधिकारी व नांदगाव शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजेश कवडे व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.