Disha Shakti

राजकीय

दौंड कृषीउत्पन्न बाजार समितीवर भाजपाचा झेंडा सभापती पदी गणेश जगदाळे तर उपासभापती पदी शरद कोळपे

Spread the love

दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या हातात दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती गेली आहे. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती गणेश जगदाळे तर उपसभापतिपदी शरद कोळपे यांची निवड झाली आहे. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश थोरात आणि भाजप आमदार राहुल कुल या दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्याकडे 9-9 अशा समान जागेवर उमेदवार निवडून आले होते.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे नवनिर्वाचित संचालक संपत बबनराव निंबाळकर यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली. ही कमी झालेली जागा भाजपच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे गेली 25 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांच्या ताब्यात असलेली दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात गेली आहे.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व
उपसभापती या पदाच्या निवडणूक प्रक्रिया आज गुरुवारी (दि. २५) दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. यावेळी सभापतिपदासाठी भाजपकडून गणेश अंकुश जगदाळे तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब मारुती शिंदे तसेच उपसभापतीपदासाठी भाजपकडून शरद बापू कोळपे व राष्ट्रवादीकडून वर्षा
मुकेश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यापदासाठी गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली.सभापतिपदासाठी गणेश जगदाळे यांना 9 व बाळासाहेब शिंदे यांना 8 मते मिळाली. उपसभापति पदासाठी शरद कोळपे यांना 9 व वर्षा मोरे यांना 8 मते मिळाली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!