Disha Shakti

राजकीय

माजी मंत्री श्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी संजय गांधी निराधार योजनेच्या नगर तालुका समितीची निवड

Spread the love

प्रतिनिधी / नाना जोशी : अहमदनगर येथे माजी राज्यमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय श्री. शिवाजीराव कर्डीले साहेब यांच्या निवास्थानी, संजय गांधी निराधार योजना नगर तालुका, अनुदान समितीवर निवड झाल्याबद्दल सर्वं नवनियुक्त समिती अध्यक्ष सदस्य मा. श्री. राजूजी दरकुंडे, तसेच समिती सदस्य आदर्श कौडगाव जांबचे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर, श्री.नामदेव शिंदे, प्रा.श्री.वसंत शिंदे सर, श्री.अमितजी आव्हाड, श्री.अशोकराव कोकाटे, श्री.जयप्रकाश पाटील, सौ. प्रयागताई लोंढे, श्री.कोके साहेब इत्यादीचा शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सर्वांचे माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव कर्डिले साहेबांनी यांनी नव नियुक्ती समिती अध्यक्ष व सदस्य यांचे अभिनंदन केले. जास्तीत जास्त गोरगरीब, सर्वसामान्य निराधार विधवा यांच्याशी सम्पर्क करून पेन्शन योजना लाभ घ्यावा तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी, आपल्या पदाचा वापर करा, व मिळालेल्या संधीचे सोन करा, असे कौडगाव जामचे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांनी सांगितले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!