अ.नगर / शेख युनूस : शेवगाव तालुक्यातील समसुद एरंडगाव येथे जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन मा. लहू गायकवाड (जिल्हाध्यक्ष, डिपीआय, संभाजीनगर)यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प.शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. काशिनाथ जगधने गुरूजी यांनी भूषविले काॅ. अण्णाभाऊ साठे यांचा संघर्षमय जीवनपट तरूण मुलांना आपल्या जीवनातील अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यास बळ देतो.
अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडलेला फकिरा हा अन्यायाविरुद्ध, शोषणमुक्त समाजासाठी इंग्रजी राजवटीविरुद्ध कसा शस्त्रास्त्र लढा उभा करून सर्वांनाच सोबत घेऊन हक्क मिळावेत म्हणून शेवटपर्यंत लढतो, त्याची प्रेरणा आज तरुण वर्गाने घेतली पाहिजे असे प्रतिपादन लाला निशाण पक्ष (महाराष्ट्र)चे तालुकाध्यक्ष काॅ निवृत्ती घोडके यांनी केले, लाल निशाण पक्ष( महाराष्ट्र )चे तालुका कार्याध्यक्ष काॅ. दत्ता घोरपडे यांनी दिले.
काॅ अण्णाभाऊ साठे आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारीक वारसा दलित समाजाने जपला पाहिजे हे सांगत असताना काॅ. अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त महाराष्ट्र च्या लढ्यातील प्रसिद्ध छक्कड “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया कायली” व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे’ हे गीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली ,या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले गावातील तालुक्याचे माजी आमदार काॅ. एकनाथराव भागवत यांचे नातू सेवानिवृत्त शिक्षक मा.कल्याण भागवत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढा सुरू असताना काॅ.अण्णाभाऊंचा सहवास या गावाला झाला तसेच कर्मवीर भाऊराव पाटलांसोबत घोटणचे जनता विद्यालय सुरू करण्यासाठी काॅ. अण्णाभाऊ साठे सोबत होते या आठवणी त्यांनी सांगितल्या तसेच संभाजीनगर डिपीआय चे जिल्हाध्यक्ष मा लहु गायकवाड यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा मुलमंत्र नवीन पीढीने अंगिकारला पाहिजे, दलित समाजाने आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षण देणे गरजेचेच आहे हे ठणकावून सांगताना आपलया घरामध्ये देवदेवतांचे फोटो ठेवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी शाहु महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले इ.महापुरुषांचे फोटो आदर्श म्हणून घराघरात ठेवले पाहिजेत असे आपल्या भाषणातून परखडपणे मांडले, सुखदेव गोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य मा. अमोल धस यांनी केले तर आभार महेश जगधने यांनी मानले, कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच मा. अप्पासाहेब गजभिव, संदिप धस,राजुभाऊ धस, गौरव मगर, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम जगधने, अमोल जगधने, आकाश जगधने,अभिजित गजभिव, राम जगधने, अजिनाथ जगधने, अजित, जगधने, अनिकेत गजभिव, अमोल जगभिव,विनोद जगधने,अजय जगधने, किरण जगधने यांनी परिश्रम घेतले.
समसूद एरंडगाव, येथे साहित्य सम्राट काॅ.अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी

0Share
Leave a reply