Disha Shakti

क्राईम

सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्यावतीने अ.नगरच्या पोलिस अधीक्षकांना निवेदन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : दिनांक 25 ऑगस्ट २०२३ रोजी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक साहेब या कार्यालयाला निवेदन देण्यात आले. निवेदनाचे कारण असे की १३ ऑगस्ट २०२३ रोजी राहुरी येथील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे वाहतूक जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब निवृत्ती आडगळे हे राहुरी मधील एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिलेला उपचाराकरिता बारामती येथे जात असताना टेंभुर्णी टोलनाक्याच्या अलीकडे काही गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तींनी चोलामंडल फायनान्स कंपनीचे माणसे आहेत असे सांगून त्यांना व त्यांच्या गाडीतील गर्भवती महिलेस व तिच्या परिवारास गाडी बाहेर काढून श्री.अडागळे यांना बाजूला घेऊन त्यांच्या खिशातील रोख रक्कम 5500 रुपये काढून घेतली व त्यांची बोलेरो गाडी नंबर MH 20 BC 27 64 क्रमांकाची गाडी दमदाटी देऊन पसार केली आहे व सदर गुंड प्रवृत्तीच्या इसमाने उलट बाबासाहेब आढागळे यांना असे दम दिले की जा तुला काय करायचे ते करून घे तुला आता तुझी गाडी भेटणार नाही त्यानंतर सदर महिलेस त्रास होत असल्याकारणाने सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेची वाहतूक जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब आढागळे यांनी ताबडतोब त्या महिलेस व तिच्या नातेवाईकांना दुसऱ्या गाडीने बसून दिले सदर गाडी ही चोलामंडल मायक्रो फायनान्स अहमदनगर यांच्या वतीने फायनान्स केली आहे .

सदर चोलामंडल फायनान्स या कंपनीने कुठल्याही प्रकारची कायदेशीर नोटीस न देता बेकायदेशीरपणे दुसऱ्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाडी ओढून नेन्याचा प्रकार घडला आहे सदर चोलामंडल कंपनीचे ब्रांच मॅनेजर व तेथील कर्मचारी नकवाल साहेब यांनी सदरील टेंभुर्णी भागातील त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आदेश दिला व गाडी ओढायला लावली या अहमदनगरच्या चोलामंडल फायनान्सने असे अनेक वेळा अनेक ठिकाणी बऱ्याच लोकांच्या गाड्या अशा प्रकारे पडलेल्या प्रकार हा आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या संघटनेच्या चौकशीत आढळून आला.

सदर बाबासाहेब निवृत्ती आडगळे यांनी ज्यावेळेस बोलोरो गाडी घेतली त्यावेळेस त्यांना असे सांगण्यात आले की तुम्हाला गाडीचे एकूण 36 हप्ते आहेत असे एक जण सांगतो तर फायनल झाल्यानंतर काही दिवसानंतरच ज्यांनी जी फाईल मंजूर केली होती तो काम सोडून जातो आणि काही दिवसानंतर चोलामंडल फायनान्स मधून फोन येतो आणि त्या अधिकाऱ्याकडून असे सांगण्यात येते की तुम्हाला आता 46 हप्ते भरावे लागेल ज्यावेळेस लोन मंजूर झालं त्यावेळेस वेलकम लेटर देताना 36 हप्त्याचीच परतफेड आहे असे सांगण्यात आले.

अशाप्रकारे जर अहमदनगर येथील चोलामंडल फायनान्स कंपनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करत असेल तर ही एक प्रकारची फसवणूकच आहे बाबासाहेब आडगळे यांच्यावर अशाप्रकारे ज्यावेळेस अन्याय होतो व बाबासाहेब आढागळे न्याय मागण्यासाठी टेंभुर्णी येथील पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवण्यात गेले असता सदरील पोलीस स्टेशन येथील ठाणे अमलदार यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही त्यामुळे बाबासाहेब आढागळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याचे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या लक्षात आले.

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेची पदाधिकारी अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी गेले असता व संबंधित गाडी अडवणारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शोध घेऊन बाबासाहेब आढागळे यांची गाडी मिळवून द्यावी व चोलामंडल फायनान्स कंपनीचे व त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास लावावा अन्यथा सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व संबंधित कुटुंबप्रमुख बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या मुलाबाळासह अहमदनगर येथील अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण करतील असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगधने अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ शिंदे राज्य प्रवक्ते निलेश मच्छिंद्र जगधने प्रमोद ससाने दीपक आव्हाड बाबाजी जगधने राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भाऊ भांड मार्गदर्शक निलेश बाळासाहेब जगधने तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड तालुका संघटक संदीप जगधने अरुण धुतडमल व स्वतः सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष यावेळी उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!