Disha Shakti

राजकीय

सकल धनगर समाज्याच्या वतीने यशवंत सेनेचे दौंड येथे मुंडण आंदोलन…

Spread the love

दौंड प्रतिनिधी किरण थोरात
दि.22 संप्टें रोजी दौंड येथे यशवंत सेनेच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील धनगर आरक्षणाच्या आंदोलन प्रसंगी आज अमरण उपोषणाचा 17 वा दिवस आहे. गेली 70 वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचीत जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी मागणी आहे. तरीसुध्दा महाराष्ट्र शासन याकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याच्या जाहीर निषेधार्थ व चौंडी येथील अमरण उपोषणास दौंड तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने जाहीर पाठींबा देण्यासाठी आज यशवंत सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष किसन हंडाळ यांनी दौंड तहसील कार्यालयासमोर मुंडन करुन निवेदन देत शासनाचा निषेध केला आहे. धनगर आरक्षण प्रश्न आवाज उठवला आहे… महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसे न झाल्यास येणाऱ्या काळात धनगर समाजाचे हे आंदोलन उग्र रुप धारण करेल व यास सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन असणार आहे याची नोंद घ्यावी. असे निवेदनत नमूद केले गेले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!