Disha Shakti

सामाजिक

शिवांकुर पतसंस्थेला 2023 चा सहकार समृद्ध पुरस्कार जाहीर

Spread the love

राहुरी  प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरातील शिवांकुर अर्बन को आप क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेस अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचा स्थैर्य निधी संघामार्फत दिला जाणार ‘सहकार समृद्धी पुरस्कार’2023 या वर्षांकरिता सर्वोत्कृष्ठ संस्था म्हणून जाहीर झाला.सहकार क्षेत्रात बळकटी आणणार्या पतसंस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने यावर्षीचा पुरस्कार 2023 साठी संस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकानानूसार पतसंस्था पुरास्कारासाठी शिवांकुर अर्बन को आप क्रेडिट सोसायटी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 21-10-2023 रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच सहकार आयुक्त अनिल कवडे व बुलढाणा अर्बन बॅंकेचे चेअरमन राधेश्यामजी चांडक यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.शिवांकुर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रकाश पवार यांनी पत्रकाराशी बोलताना म्हणाले हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या पारदर्शक कारभाराचे प्रतिक आहे.

यामध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब पवार पाटील, व्हा.चेअरमन नारायण निमसे, जेष्ठ संचालक भास्करराव पवार पाटील तसेच डॉ.नरेंद्र इंगळे, डॉ.किशोर पवार, किशोर शिरसाट, गणेश शेळके, सौ.मंगलताई पवार, सौ.मिनाक्षी औटी, बाळासाहेब बाचकर,आदी संचालक ,ठेविदार, दैनिक ठेव प्रतिनिधी , कर्जदार तसेच कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.सहकार समृद्धी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे , अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर निधीचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे, वसंतलाल लोढा, प्रकाश पारख, बाळासाहेब उंडे,कपाळे,कडू भाऊ काळे आदींनी अभिनंदन केले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी देखील अभिनंदन केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!