बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली येथे भाजपाच्या वतीने,भाजपा युवा मोर्चा, महीला मोर्चा व सेलच्या वतिने महाविकास आघाडी चा निषेध करत पुतळा जाळण्यात आला कंत्राटी नोकर भरतीचा जी आर स्वतः काढून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री महायुतीवर खापर फोडण्यात येत असल्यामुळे शहरातील तहसील कार्यालया समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करत महाविकास आघाडी नेत्यांचा पुतळा जाळण्यात आला. राज्य शासनाने नुकतीच विविध विभागांत कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढला होता त्यामुळे संपूर्ण राज्यात महायुती सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात होती याचा भाजपाकडून निषेध नोंदवला व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा संयुक्त पुतळा जाळून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी यादवरावजी तुडमे मा.नगराध्यक्ष बिलोली, लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य, चंद्रशेखर पा.सावळीकर ता.अध्यक्ष बिलोली,सतिश गौड मोतीवार जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, इंद्रजित तुडमे शहराध्यक्ष बिलोली, विजय कुंचनवार मा.नगराध्यक्ष, साईराज रुद्रुरकर युवा मोर्चा शहराध्यक्ष, महेश पाटील हांडे,संदीप पाटील रामपुरे ता.अध्यक्ष युवा मोर्चा,आबारावजी संगनोड जि.सरचिटणीस ओबीसी, राजकुमार गादगे,संभाजी शेळके मा.पं.स.सदस्य, शेख युनूस अल्पसंख्यांक ता.अध्यक्ष, संजय पाटील भोसले ता.सरचिटणीस, भाऊसाहेब बनबरे, भगवान पा कानोले, ता.चिटणीस,अभिजित धरमूरे, माधवराव दंतापल्ले शाखाध्यक्ष, मिराताई संगनोर जि उपाध्यक्ष,अॅड गिताताई बोमनाळीकर ता.अध्यक्ष म.मो,सुलोचनाताई स्वामी चिटणीस,गोविंद शेळके,गंगाधर बिगेवार, सरपंच बालाजी कुरनापल्ले, मानीक पाटील, केशव मुरशेटवाड, नरवाडे पा तोरणा सर्व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येनी निषेध करण्यासाठी उपस्थित होते.
Leave a reply