बिलोली प्रतिनिधी /साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील मौजे कोल्हेबोरगांव येथे सार्वजनिक नवरात्र दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. जय किसान माध्यमिक विद्यालय कोल्हे बोरगाव येथील आदर्श शिक्षक श्री ह.भ.प.बळीराम महाराज हासगुळे सर यांचे हरी किर्तन संपन्न झाले. आई,बहीण,पत्नी घरामध्ये असलेले दुर्गेची अवतार असून त्यांची अवहेलना होणार नाही याची दक्षता जर आपण घेतली तर खरी नवरात्र साजरा साजरा केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होईल असे प्रतिपादन हसगुळे महाराज यांनी केले.
पुढे बोलताना महाराजांनी असे सांगितले नवरात्र मध्ये आपण दुर्गा मातेची विधीवत स्थापना करतो. मनोभावे पुजा अर्चा करतोत पण घरात असणारे आई,बहीण,व पत्नी यांची छोटया मोठया कारणांनी त्यांची मने दुखावतो. स्त्रीचा अपमान म्हणजेच देवीचा अपमान कोणत्या कारणावरून स्त्री हवलेहना होणार नाही हीच खरी दुर्गा ची उपासना असे आवाहन महाराजांनी किर्तनाचा माध्यामातून केले. आपुलीया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर सुंदर असे किर्तन करुन भक्तजनाना मंत्र मुग्ध केले.
किर्तन करण्याची सरांची पहीलीच वेळ असून अतिशय सुंदर सुरुवात,शब्दांची सुस्पष्टता, सुंदर मांडणी, समर्पक दृष्टांत, विविध अनुभव सांगून लोकांची मने जिंकली. लोहगांव, बेळकोणी, गागलेगाव येथील भजनी मंडळाच्या सुमधुर गायनाने किर्तनाला एक सुंदर रुप प्राप्त झाले. किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले. या प्रसंगी गणेश सुवर्णकार सर, डुमनवाड सर, सार्वजनिक नवरात्र दुर्गा महोत्सवाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
आई,बहीण,पत्नी हीच दुर्गेचे रुपे त्यांची उपासना हीच खरी देवीची उपासना ह.भ.प.बळीराम महाराज हासगुळे

0Share
Leave a reply