दौंड प्रतिनिधी : नितीन पाटोळे
दौंड : मंगळवार दि: 31/10/23 रोजी सकाळी ठीक 9 वाजता मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली यवत. ता. दौंड. जि. पुणे येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहील अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
दि.30/10/23 रोजी संध्याकाळी ठीक आठ वाजता कॅण्डल मार्च रॅली काढण्यात आली होती. यवत तेथे ठीक ठिकाणी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाही असे बॅनर लावण्यात आले आहेत. व 31तारखे पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले, मंगळवारी सकाळपासूनच यवत मध्ये कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
सकाळी उपोषणासाठी यवतमधील मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन उपोषणास पाठिंबा व प्रतिसाद दिला.
या साखळी उपोषणासाठी यवत गावाचे सरपंच समीर दोरगे,उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे,गणेश शेळके,राजेंद्र खुटवड, नाथा दोरगे,विलास दोरगे,उत्तम गायकवाड, दत्ता दादर, सुरज चोरगे, चेतन ढवळे, आदी ग्रामस्थ या उपोषणाला बसले आहेत