मुंबई कांदिवली प्रतिनिधी /भारत कांदिवली : जेजुरी या ठिकाणी रविवार दिनांक 26 नोव्हेंबर व सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर या दिवशी मौर्य क्रांती महासंघ आयोजीत दुसरें अधिवेशन व धनगर जागृती परिषद महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शाहिर सागर माने आणि सहकारी यांनी आपल्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमात धनगरी ओव्या, गजनृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला.या धनगर समाज बांधवांनी सहभागी होऊन भरभरून दाद दिली.सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध सत्रात दिवस मौर्य क्रांती महासंघाचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
सुरुवातीला कुलदैवत श्री.खंडोबा पूजन, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन आणि मशाल प्रज्वलीत करण्यात आली. पहिल्या सत्रात व्याख्याते अमोल शिंगाडे यांनी शिक्षणा कडून समृद्धीकडे या विषयावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की,” हवा, पाणी, आकाश,पाताळ,अशा निसर्गाची पूजा करणारा हा आपला धनगर समाज आहे.प्रत्येक समाज बांधवांनी आपला इतिहास समजून घ्यायला पाहिजे.शिक्षणा कडून च आपण समृद्धी कडे जाऊ शकतो.
वैज्ञानिक दृष्टी ही शिक्षणानेच येत असल्याने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे.” दुसरे व्याख्याते संचित धनवे यांनी आपली लोकदैवते,व आमची दैदिप्यमान विरासत या विषयावर अनेक ऐतिहासिक घटना सांगून आपले मत व्यक्त केले.स्वर्णमाला मस्के यांनी स्त्री युवा नेतृत्व व त्यापुढील आवाहन या विषयावर व्याख्यान देताना सांगितले की,” नेतृत्व राजकारणात व घरात ही असते.समाजातील स्त्रीयांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व प्रथम मान्य करावे.
स्त्रीमध्ये संकटाला तोंड देण्याची प्रचंड ताकद असते.घरात मुलींना, स्त्री यांना शिक्षण, नोकरी साठी प्रोत्साहन द्यावे.” वाघर चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेंद्र बरकडे यांनी वाघर विचारांची या विषयावर बोलताना सांगितले की,” अनिष्ट विचारांची वाघर (जाळे) तोडण्यासाठी मौर्य क्रांती महासंघ सातत्याने प्रयत्नशील आहे.अंधश्रध्देची वाघर, अज्ञानाची वाघर,रुढी परंपरा यात आपण गुंतलो आहे.यातून वाघर तोडून आपल्याला बाहेर पडलेच पाहिजे.हे शिक्षणानेच होईल. अंधश्रध्दा, वाईट चालीरिती,या शिक्षणानेच दूर करु शकतो. पण काही चांगल्या परंपरा,रुढी आहेत त्यांचे जतन ही करावे, जेणेकरून त्या टिकल्या ही पाहिजेच.उदा.आपली वेशभूषा या बाबत आपल्याला अभिमान असायला पाहिजे. नंतर संतोष तांबे यांना आजचा युवा या विषयावर बोलताना सांगितले की,” समाजात क्रांती घडवून आणायची असेल तर युवा पिढी शिकली पाहिजे. संघर्ष करुन युवाने समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले पाहिजे.
आजचा युवा मोबाईल, फेसबुक,नशा च्या आहारी जाऊन आपले जीवन बरबाद करताना दिसत आहेत.त्यांनी यातून बाहेर पडावे, यासाठी युवा ना योग्य दिशा देण्याचे काम मौर्य क्रांती महासंघ करीत आहे.समाजात क्रांती सूर्य घडविण्याचे काम महासंघ करीत आहे.”प्रथम सत्रातील सर्व विषयांची व्याख्याने म्हणजे एक प्रकारे वैचारिक मेजवानी च होती.महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील विशेष सत्कार करण्यात आले, त्या मध्ये मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचा सत्कार महासंघाचे अध्यक्ष बलभीम माथेले यांनी केला.
यावेळी मौर्य क्रांती महासंघाचे अध्यक्ष बलभीम माथेले, अक्की सागर, राजीव हाके, प्रकाश कुंटे,बापू मासाळ, हनुमंत दवंडे, तुकाराम जानकर, इंजि.शिवाजी शेंडगे, शांतीलाल बनसोडे,संदिप दासनोर, सत्यवान दुधाळ, गोपीचंद वडीतके,शैला नवघरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जेजुरी येथे मौर्य क्रांती महासंघाचे दुसरे अधिवेशन व धनगर जागृती परिषद मोठ्या जल्लोषात संपन्न

0Share
Leave a reply