Disha Shakti

राजकीय

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पुन्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

Spread the love

जितू शिंदे / प्रतिनिधी  : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई इथे बोलताना पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर लोकांच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका निर्माण झालेली आहे. मलासुद्धा 2012 मधील निवडणुकीत ईव्हीएम मुळे पराभव पत्करावा लागलेला आहे याबाबतची पिटीशन लढताना मला अनेक संकटाला सामोरे जावे लागलेले आहे.तज्ञांनी संशयास्पद ईव्हीएम बद्दल मत मांडावे , ‘ असे म्हटलेले आहे.

सोमवारी मुंबई इथे एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की , पाच राज्याच्या निवडणुकीनंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून आगामी काळात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदापर्यंत 2024 पर्यंत राहतील.

आपला कार्यकाळ देखील ते पूर्ण करतील ‘, असे देखील ते म्हणाले.प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की , ‘ भाजपचा विजय झाला पण तो का झाला आणि कसा झाला याचे त्यातील बारकावे आल्यानंतर आपण बोलू शकू . निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिलेली नाही ती आल्यानंतर सविस्तर बोलू. भाजपचे राजकीय पतन होत असल्याचे बोलले जात होते ते वस्तुस्थितीला धरून नसल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसच्या झालेल्या पराभवामुळे काँग्रेसची इंडिया आघाडीत वाटा-घाटी करण्याची ताकद कमी होणार नाही ‘, असे देखील ते म्हणाले. आम्ही सुरुवातीपासून इंडिया आघाडीत जाण्यास इच्छुक आहोत असे देखील त्यांनी पुढे म्हटलेले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!