Disha Shakti

सामाजिक

नांदगाव शहरात अक्षदा व मंगल कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत…

Spread the love

नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचे भव्य दिव्य श्री राममंदिर आयोध्या मध्ये जवळजवळ पूर्णतः झाले आहे, त्या अनुषंगाने २२जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांचे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात निमंत्रण देण्यासाठी थेट अयोध्या वरून अक्षदा व कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षदा कलश यात्रा नांदगाव येथे आली असता या सुवर्ण क्षणाचे समस्त नांदगावकरांनी साक्षी होऊन अक्षदा कलश यात्रेचे स्वागत केले.

यावेळी श्री प्रभू रामचंद्रांचे भजन व वाजत गाजत पथकावर पुष्प वर्षाव करत जय श्रीराम नारा देत ४५० वर्षाच्या संघर्षमय इतिहासानंतर हा सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी या अमृत महोत्सव प्रसंगी सर्व हिंदू समाज एकत्र झाला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नांदगाव तालुका कार्यवाहक देवराम फुपाणे, भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव सागर फाटे, ज्येष्ठ स्वयंसेवक द्वारकानाथ कलंत्री सामाजिक कार्यकर्ते उमेश उगले, विनोद अहिरे, राहुल पैठणकर, सिद्धेश भावसार, स्वराज शर्मा, राम शिंदे, ऋषिकेश सोनवणे, तुषार सोनवणे, गणेश शर्मा,पशुराम हरळे, तुषार चव्हाण,यश सेठी, दर्शन शर्मा, प्रतीक मराळकर, दर्शन टेहळे, राजू निकम,चेतन जाधव, मयूर कुलकर्णी,रवी कांदिलकर, अतुल कासलीवाल, ऋतिक गुप्ता, ज्ञानेश्वर विसपुते, गणेश विसपुते,आकाश पानकर, अमोल चव्हाण, वैभव शर्मा, हर्षल जगताप, भरत मामा, गणेश कदम सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!