Disha Shakti

क्राईम

अँड.आढाव दांपत्याचा खून करणारा पाचवा आरोपी राहुरी पोलिसांकडून जेरबंद

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 75/ 2024 मध्ये वकील दांपत्यास कोर्टातून पळून नेऊन त्यांचा खून करून उंबरे गावातील स्मशानभूमीतील विहिरीत टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी चार आरोपी 27 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आलेले होते.फरार पाचवा आरोपी नामे कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे, राहणार उंबरे याचे बाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना त्याच्या ठाव ठिकाण बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे तपास पथक व वांबोरी बीट चे पथकाने त्यास तात्काळ अटक केली.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री.बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पो. उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ.वाल्मिक पारधी, पोकॉ.अंकुश भोसले, पोकॉ.सतीश कुराडे, पोहे.कॉ.विकास साळवे, पोहेकॉ.अशोक शिंदे,पोना नागरगोजे, पोकॉ.अजिनाथ पाखरे, पोना बागुल असे सदरची कामगिरी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!