वैजापूर प्रतिनिधी / नितीन पाटुळे : बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे रक्तगट तपासणी यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या तपासणी साठी वैजापूर येथील आधार हाॅस्पिटल चे डाॅ.श्री ईश्वर अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परसोडा, ता.वैजापूर येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता.यु.डायस प्रणाली मध्ये भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रक्त गट आवश्यक असल्याने शाळेमध्ये च रक्त गट तपासणी करून शाळेतल्या मुलांना व मुलींना रक्त गट कार्ड वाटप करण्यात आले.
ही रक्त गट तपासणी शाळेमध्ये मोफत केल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमासाठी शाळेचे केंद्र प्रमुख श्याम रजपूत उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री विकास तावरे, नितीन सातपुते, श्री सतीश जाधव, श्री श्रीधर कदम आणि अग्रवाल मॅडम व सर्व स्टाफ यांनी सहकार्य व मेहनत घेतली.
Leave a reply