विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : अहमदनगर येथे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते जाफराबादच्या सरपंच सौ. शारदा संदिप शेलार, ग्रा.पं. सदस्य संदिप शेलार, विस्तार अधिकारी विजय चराटे, ग्रामसेवक ओहोळ राजू, ग्रामस्थ कैलास दिवटे, राहुल गायकवाड यांना सन २०२२- २३ मध्ये मा.जि.प. अध्यक्षा ना. शालिनिताई विखे पाटील, मा. सभापती दिपक आण्णा पटारे, मा. गटविकास अधिकारी प्रविन सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कालिन सरपंच संदिप शेलार तथा ग्रामसेवक श्रीमती सुप्रिया शेटे, ग्रा.पं. कर्मचारी अनिल धनवटे व सदस्य बोर्ड यांच्या काळातील ग्रामस्थांच्या एकजुटीने केलेल्या कामाची दखल घेऊन आदर्श गाव जाफराबाद ग्रामपंचायतीस मिळालेला जिल्हा स्तरीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार काल २६ जानेवारीच्या दिवशी ना. विखे यांच्याहस्ते वितरित करण्यात आला.
ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार जाफराबादच्या सरपंच सौ.शारदा शेलार यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याहस्ते वितरित

0Share
Leave a reply