Disha Shakti

Uncategorized

राहुरी येथील वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन करणारा सराईत आरोपी त्याचे ०३ साथीदारांसह २४ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार :राहुरी येथील वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन करणारा सराईत आरोपी त्याचे ०३ साथीदारांसह २४ तासाचे आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर पोलीसांनी कारवाई केली आहे. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक २५/०१/२०२४ रोजी १) राजाराम जयवंत आढाव वय ५२ वर्षे, २) मनिषा राजाराम आढाव वय ४२ वर्षे, दोन्ही रा. मानोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर हे वकिल दांम्पत्य त्यांचे राहते घरुन राहुरी कोर्टामध्ये गेले होते. परंतु दुपारनंतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांचेशी संपर्क केला असता त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नसल्या कारणाने लता राजेश शिंदे वय ३८ वर्षे, रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर यांनी दिलेल्या खबरीवरुन राहुरी पोलीस स्टेशन मनुष्य मिसींग रजि.नंबर २६/२०२४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

राहुरी परिसरामधुन वकिल दांम्पत्य मिसींग झाल्याची घटना घडल्याने मा. श्री. राकेश ओलासाहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आढाव वकिल दांम्पत्याचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी वअंमलदार पोउपनि तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भिमराज खसे, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, यांचे तीन वेगवेगळे पथक तयार करुन पथकास सुचना देवुन वकिल दांम्पत्याचा शोध घेणेकामी रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस पथक हे मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेत असतांना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे दिसुन आले. सदर कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग रा. राहुरी याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकिल दांम्पत्याकडे असल्याचे व सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसुन आलेली संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकास किरण दुशींग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभुमी माहित असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पूर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव १) किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग वय ३२ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सखोल व बारकाईने तपास करता त्याने मागील काही दिवसापासुन त्याचे साथीदार २) भैया उर्फ सागर साहेबराव खांदे रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर, ३) शुभम संजीत महाडिक रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ४) हर्षल दत्तात्रय ढोकणे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर, ५) बबन सुनिल मोरे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचेसह कट करुन वकिल दांम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलावुन घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वतःचे गाडीत बसवुन वकिल दांम्पत्यांचे घरी घेवुन जावुन त्यांचे घरामध्ये दोघांचे हात पाय बांधुन ठेवुन ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली.

परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केलेबाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकुन दिले व त्यानंतर वकिल दांम्पत्याची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याचे सांगितले. आरोपीने सांगितलेल्या हकीगतीवरुन खात्री करता उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये वकिल दांम्पत्याचे मृतदेह आढळुन आले आहेत.

त्यादरम्यान सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्याने तक्रारदार लता राजेश शिंदे वय ३८ वर्षे, रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ३०२, ३६३,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी किरण दुशींग याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे वय २३ वर्षे, रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर, शुभम संजीत महाडिक वय २५ वर्षे, रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता. राहुरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे वय २० वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले असुन त्यांना पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी खुन, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!